पालम ( आरूणा शर्मा ) ➡️ येथील श्री सदगुरु बाळकृष्ण गोशाळा पालम येथे दि. 28 मार्च रोजी भारत विकास संगम व गोसंवर्धन महासंघ यांच्या वतीने गोशाळेची पाहणी व सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी भारत विकास संगम चे महाराष्ट्र राज्य समन्वयक विलास देशपांडे, गोसंवर्धन महासंघ महाराष्ट्र राज्य संचालक विजय वरूडकर प्राणी क्लेश चे अधीकारी, परमेश्वर स्वामी,विनोद डावरे, प्रदीप दाभाडे, बालाजी पांचाळ, तुकाराम ठाकरे यांच्या उपस्थितीत सदगुरु बाळकृष्ण गोशाळा पालम येथे गोमाता पूजन करण्यात आले व गो मातेस नमन करण्यात आले.
त्यानंतर सदगुरु बाळकृष्ण गोशाळा पाहणी करण्यात आली. यावेळी गोशाळेच्या वतीने उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आले. यावेळी सदगुरु बाळकृष्ण गोशाळा पालमचे सचिव गोसेवक अनंत (अविनाश) जोशी यांनी उपस्थितांचा सन्मान केला
0 Comments