पालम ➡️ सामाजिक कामे करताना नेहमी सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात. अनेकदा त्यानच्यावर संकट ओढवले जातात. अशा संकटाना न जुमानता आपण निःपक्ष पत्रकारिता करावी. तसेच पत्रकार भवन उभे करण्यासाठी 05 लाख रुपये निधी देऊ व सर्व पत्रकाराचा विमा काढून देण्यासाठी पुढाकार घेतो मी नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.
पालम शहरात 29 जानेवारी रोजी सायंकाळी 05 वाजता पालम तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी पदाधिकारी सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी दिवटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लिंबाजी टोल, रुपेश शिनगारे, डॉ बडेसाब शेख, डॉ. जयकुमार साखरकर, वामन बरडे, तुकाराम कराळे, माऊली घोरपडे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघ अध्यक्ष शांतीलाल शर्मा, व पदधिकारी धोंडीराम कळंबे, लक्ष्मण दुधाटे, मारोती नाईकवाडे, गुणवंत सराफ,मोतीराम शिंदे,शेख गौस,राहुल गायकवाड, भारत जोगदंड,माधव हनवते, शिवाजी शिंदे, लक्ष्मण गायकवाड, चांद तांबोळी, कल्याण सिरस्कर, रुखामजी गिनगीने,आनंद साखल,रामप्रसाद कदम, बालासाहेब फुलपगार आदींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर लांडे यांनी केले तर आभार भगवान करंजे यांनी मानले
0 Comments