यवतमाळ ➡️ टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने, आ.मदानभाऊ येरावार यांच्या सहकार्याने व टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन यवतमाळ यांच्या वतीने दि. 26 ते 28 नोंव्हेबर दरम्यान संपन्न झाली. यात राज्य सिनियर पुरुष गटात परभणी तर महिला गटात बीड जिल्हा तर मिश्र दुहेरी गटात सोलापूर अजिंक्य ठरला.
💠महिला गटात : बीड - प्रथम, चंद्रपूर- व्दितीय, तर यवतमाळ- तृतीय ठरला.
💠 मिश्र दुहेरी- सोलापूर- प्रथम, परभणी- व्दितीय, बीड - तृतीय.
💠वयस्कर गटात : एकेरी मध्ये साहेबराव राठोड -प्रथम (यवतमाळ ), जयकुमार सोनखासकर-व्दितीय (अकोला), किरण घोलप (नाशिक).
💠 दुहेरी गटात-हिंगोली, यवतमाळ, परभणी, अनुक्रमे विजयी ठरले.
बक्षिस वितरण सोहळा टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्य संघटनेचे अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, डॉ. रामपूरकर, संजय कोल्हे, डॉ. विकास टोणे, विभागीय सचिव जयकुमार सोनखासकर, रामेश्वर कोरडे, राज्य सहसचिव किशोर चौधरी, संजय सातारकर, जिल्हा सचिव अभय धोबे, उपाध्यक्ष प्रकाश उदासी, प्रा. निलेश भगत,सहसचिव शाहीद सय्यद, रवींद्र पाळेकर,विकास शेळके, मीर सर, गिरीराज गुप्ता, आदी उपस्थित होते. स्पर्धेत पंच मंडळ अध्यक्ष प्रफुल्ल कुमार, सतिश नावाडे, प्रमोद महाजन, गजानन शिंदे, गणेश पाटील, अक्षय गामणे,विवेक मल्लिक, यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विकास टोणे यांनी केले.
0 Comments