परभणी ➡️ गीता जयंतीचे औचित्य साधून गीता परिवार परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आज शिवाजी कॉलेज मैदान येथे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात गीता परिवार कर्मठ कार्यकर्त्या स्व. सौ. वर्षा कालानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
ही स्पर्धा जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावर घेण्यात आली. परभणी तालुका पातळीवर यामध्ये जवळपास 80 मुलांनी सहभाग घेतला. यामध्ये मुलांचे चार गट करण्यात आले. पहिला गट शिशुवर्ग, दुसरा गट पहिली ते दुसरी, तीसरा गट तिसरी ते चौथी आणि चौथा गट पाचवी ते सहावी. स्पर्धेदरम्यान मुलांना खाऊच्या स्वरूपात बिस्किट, पॉपिंस, सरबत देण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री हेमंत जामकर यांनी मैदान उपलब्ध करून दिले. तसेच कॉलेजचे प्रा. जाधव सर, प्रा. मोरे सर, प्रा. कोकीळ सर, प्रवीण सर यांचे मोलाचे सहाय्य मिळाले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परभणी जिल्हा गीता परिवार अध्यक्ष ऍड. सौ. कविता मानधने, सचिव सौ. माधुरी सराफ, सहसचिव सौ. सुनिता लोया, सौ. विद्या डागा, सौ. सरोज गटांनी, सौ. प्रिया दरक, नेहा दरक , निशा धुत, तृप्ति मनियार, सुनीता मानधने यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रथमोपचारासाठी डॉ. सौ. पूजा बाहेती व डॉ. पवन चांडक यांचे सहाय्य लाभले.
0 Comments