परभणी ➡️ शहरातील इटलापुर मोहल्ला येथे जिल्हाधिकारी अचल गोयल व महापालीका आयुक्त देविदास पवार यांनी शुक्रवारी (दि.29) भेट देत नागरीकांशी संवाद साधत लसीकरण करुन घेतले. यावेळी 33 मज्जीद येथे देखील मौलवींशी चर्चा केली.
शहरात महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यासाठी अधिकारी भेटी देत नागरीकांची चर्चा करुन लसीकरण करत आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी ऑचल गोयल व महापालीका आयुक्त देविदास पवार इटलापुर मोहल्ला येथे भेट दिली.
यावेळी महिला, पुरुष यांच्याशी चर्चा करत लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दुर केले.यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले. तसेच मज्जीदमध्ये मौलवींशी चर्चा करत लसीकरण विषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील,उपायुक्त प्रदिप जगताप,उपायुक्त देविदास जाधव,माजी नगरसेवक अहमद भाई इत्यादी उपस्थित होते.
0 Comments