जिंतूर ➡️ शहरातील गणपती गल्ली परिसरात घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील 05 लाख रुपये नगद व इतर सोन्याचे दागिने असा 08 लाख 30 हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.31) सकाळी उघडकीस आली. तसेच नागरिकांनी बाहेर गावी जाताना आपल्या घराची योग्य काळजी सूचना पोलिसांनी केली आहे.
बाबत माहिती अशी की, बालाजी प्रल्हाद काळे हे गणपती गल्ली येथे राहतात. शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले होते. तर त्यांचे आईवडील उपचारासाठी नांदेड येथे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले 05 लाख रुपये नगदी, 02 तोळ्याच्या सोन्याच्या साखळ्या, सोन्याच्या अंगठ्या, कानातील चैन, झुंबर, चांदीचे भांडे व घरातील 25 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही चोरट्यांनी लंपास केला.
यात एकूण 08 लाख 30 हजार रुपयाचा माल चोरट्यांनी लंपास केला. मंगळवारी सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजार्यांनी बालाजी काळे यांना फोनवरून सांगितले. घटनेच्या तपासासाठी परभणी येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंत चोरट्यांना माग काढला. परंतु त्यानंतर चोरटे वाहनाने पसार झाले असावेत असा अंदाज आहे.
0 Comments