सेलू ➡️ तालुक्यात देवगाव फाटा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना नवाबजी मलिक आले असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन आज देण्यात आले.
देवगाव फाटा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना नवाबजी मलिक यांच्या सह माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे,सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणजित गजमल, जिल्हा परिषद सदस्य राम नाना खराबे,विनोद तरटे, सचिन राऊत, कलीमभाई आदींनी पालकमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी केली.
0 Comments