पाथरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रथम माजलगाव ते मानवत रोडवर केलेल्या कारवाईत सर्जेराव प्रल्हाद शिंदे, शिवाजी दत्तराव शिंदे, अशोक सक्राते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई तालुक्यातील हादगाव येथे करण्यात आली. पोलिसांनी ज्ञानेश्वर श्रीराम साहकुडकर, आकाश किशोरप्रसाद तिवारी, अशोक सक्राते, बाबा नखाते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी कारवाई माजलगाव रोडवरील ढालेगाव येथे करण्यात आली. या कारवाईत नुरोद्दीन कलीमोद्दीन अन्सारी, अब्दुल मुजाहिद अब्दुल वाहेद अन्सारी, रईस अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही कारवायात मिळून पोलिसांनी राजनिवास, गोवा, जाफरानी जर्दा आदी 04 लाख 92 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. वाहन, मोबाईल इतर साहित्य व गुटखा मिळून 25 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0 Comments