Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील 27 एप्रिलचा रिपोर्ट






नांदेड जिल्ह्यात 1 हजार 4 व्यक्ती कोरोना बाधित, 29 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

नांदेड ➡️ जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 416 अहवालापैकी 1 हजार 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 753 तर अँटिजेन तपासणीद्वारे 251 अहवाल बाधित आहेत. दिनांक 25 ते 27 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 483 एवढी झाली आहे.जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 77  हजार 932 एवढी झाली असून यातील 63  हजार  782  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  12  हजार  405  रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.


परभणी जिल्ह्यात मंगळवारी 1033 व्यक्ती बाधित, 20 रुग्णांचा मृत्यू

परभणी ➡️ जिल्ह्यात मंगळवारी (दि.27) तब्बल 1 हजार 33 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 735 व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

रुग्णालयातील कक्षात 6 हजार 860 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 833 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 33 हजार 133 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 25 हजार 440 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 2 लाख 32 हजार 949 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 99 हजार 840 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 32 हजार 42 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 927 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.


 

 





Post a Comment

0 Comments