Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

देवगाव फाटा चेकपोस्टवर 13 बाॅक्स देशी दारू जप्त,एक आरोपी अटक





                    
परभणी ➡️ चारठाणा पोलीस ठाणे अंतगर्त देवगाव फाटा चेकपोस्ट मंठयाकडुन जिंतूर कडे जात असलेल्या कारमध्ये  देशीदारू जात असल्याची गुप्त माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी चेकपोस्टवर सापडा रचून 13 बाॅक्स देशी दारू किंमत 32 हजार 448 व 02 लाख रूपये किंमतीची कार असा एकुण 02 लाख 32 हजार 448 रूपयांचा ऐवज  पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी एका आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार दि  27 रोजी सकाळी करण्यात आली.



या बाबत आधिक माहिती की, कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरू असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने  जिल्हाबंदी अनुषंगाने देवगाव फाटा येथे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. दि. 27 रोजी सकाळी चारठाणा पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे देशी दारू अवैध मार्गाने बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी  जात असल्याची माहिती मिळताच परभणी पोलीस अधीक्षक जयत मिना जिंतूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रवण दत्त यांच्या मार्ग दर्शनाखाली चारठाणा पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर, जमादार गुलाब भिसे, पोलीस नाईक रासकटला, शिराळे  बळीराम इघारे, बि.आर झाडे, होमगार्ड चव्हाण, शिक्षक एस.एच.घुले,एस.आर.घुगे,एस.बी. चव्हाण, एच.आर.हळमणकर यांच्या पथकाने  सापडा रचला.

ही कार  (एम.एच.12 - जी झेड- 6156)  देवगाव फाटा चेकपोस्टवर येताच कार थांबवून कारच्या डिकीत पाहणी केली असता  देशी दारूचे 13  बॉक्स अढळून आले. या वेळी पोलीसांनी 32 हजार 448 रूपयांची देशी दारू व 02 लाख रुपये किंमतीची टोयटा इटोस कार जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर गोपाळराव  गायकवाड रा.झरी जि.परभणी यांच्या विरूद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुरन 43/2021 कलम 64 (अ)  भादवी 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गुलाब भिसे हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments