परभणी ➡️ शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 70 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. 85 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात 222 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 324 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 518 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 7 हजार 972 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 25 हजार 361 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 16 हजार 285 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 362 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 574 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.
0 Comments