कोल्हापूर ➡️ राजेंद्रनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणात मेलेली पाल सापडल्यावर त्याबद्दलचा जाब विचारणार्या तरुणांना हॉटेलमधील कर्मचार्यांनी बेदम मारहाण केली. यात 04 तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री 09 वाजता घडली. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
काही तरुण शनिवारी रात्री 8.30 वाजता हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी एक शाकाहारी व मांसाहरी पदार्थ मागविला. शाकाहारी पदार्थामध्ये मेलेली पाल तरुणांना आढळून आली. त्यांनी याची माहिती हॉटेल मॅनेजरला देत जाब विचारला. काही तरुणांनी व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. या तरुणांना शूटिंग करू नका, अशी जबरदस्ती हॉटेल कर्मचार्यानी केली. मॅनेजर व तेथील बाऊन्सर, वेटर यांनी तरुणांना बेदम मारहाण केली, असा आरोप जखमी तरुणांनी केला आहे. यातील काही जखमी तरुणांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.
0 Comments