परभणी ➡️ जिंतूर तालुक्यातील कौसडी दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक लिंबाजीराव विखे यांच्याकडून 31 हजार रुपये व दुतीय पारितोषक मनोज बुधवार यांच्याकडून 21 हजार रुपये तसेच तृतीय पारितोषिक शेख इमरान यांच्याकडून 11 हजार रुपये देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यातील 45 संघानी सहभाग नोंदविला आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता सत्काराचा कार्यक्रम पार पडला यामध्ये आयोजकांच्या वतीने प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा पन सत्कार करण्यात आला.
सुभाषचंद्र मारकड यांनी फलंदाजी करून या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास सरपंचा पाशा खाॅ पठाण उपसरपंच लिंबाजीराव ईखे माजी सरपंच यशवंतराव देशमुख माजी उपसरपंच शेख महेबुब ग्रा.पं.सदस्य शेख बिलालोद्दीन, गुलाम पाशा नाईक,समीर पठाण,डॉ.महेश देशमुख,चंद्रकांत कुलकर्णी, रौफ अन्सारी,भारत जिवने हे उपस्थित होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन शेख नियाजोद्दीन हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक अन्वर बेग, शेख नईमोद्दीन कौसडीकर, मुजाहेद कादरी, दीपक मोरे, गोविंद घुगे, शेख मंजुर, अशोक देशमुख फिरोज पठाण शेख जुनेद गोविंद बारबुंड यांनी परिश्रम घेतले होते
0 Comments