Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेड दौर्‍यातही गीताच्या बालपणाच्या स्मृती नाही जुळले





परभणी
➡️ आपल्या आई-वडीलांच्या शोधार्थ प्रवासास निघालेल्या गीता हीने मंगळवारी (दि.29) गंगाखेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरासह गोदाकाठावरील मंदिरे व अन्य भागांना भेटी दिली. परंतु या भेटीतून तिच्या बालपणाच्या आठवणातील वर्णनाशी स्मृती जुळल्या नाहीत. जिंतूर येथील एका महिलाने गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला असून त्या महिलेच्या भेटीसाठी गीता व तिचे सहकारी मंगळवारी सायंकाळी जिंतूरकडे रवाना झाले. पण ही औरंगाबादेत असल्याने ती तेथून जिंतूरकडून निघाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पाकिस्तानात चुकून गेलेली आई-वडीलांच्या शोधार्थ निघालेल्या गीता हीचे सोमवारी (दि.28) दुपारी अडीचच्या सुमारास सचखंड एक्स्प्रेसने परभणीत आगमन झाले. तिच्यासह सहकार्‍यांचे अनिकेत सेलगावकर व रेल्वे पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांनी रेल्वेस्थानकावर स्वागत केले. त्यानंतर तीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. तेथून ती सेलगावकर यांच्या निवासस्थानी मुक्कामी होती. त्यावेळी तिचे डॉ. अशोक सेलगावकर यांच्यासह कुटूंबियांनी स्वागत केले. तिच्यासह अनिकेत सेलगावकर व मध्यप्रदेशातील आनंद मूकबधीर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेंद्र पुरोहित, इंदूर रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी साधना बघेल हे मंगळवारी सकाळी गंगाखेडला रवाना झाले. तेथे पोचल्याबरोबर गीता हीने वर्णन केल्याप्रमाणे गंगाखेड रेल्वेस्थानकाच्या परिसरास भेटी दिल्या. 

गीतानी सांगितलेल्या वर्णनानुसार तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक आहे. परिसरात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जाते, असे म्हटले. त्या पार्श्वभूमीवर गीता व तीच्या सहकार्‍यांनी गोदावरी काठावरील बालाजी मंदिर, चिंतामणी मंदिर, शनि मंदीरास भेट दिली. त्यावेळी तिच्यासोबत स्थानिक रेल्वे कर्मचारी मोईन पठाण हे होते. तिने या मंदिर परिसरात भेट दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. यातील काहीच आठवत नसल्याचे गीताने उपस्थितांना सांगितल्यानंतर सारे जण परभणीकडे रवाना झाले.





Post a Comment

0 Comments