Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अधिकाऱ्यांचा त्रास होत असल्याचा आरोप करून चालकाने हाताची नस कापून घेतली





परभणी
➡️ जिंतूर आगारातील संबंधित अधिकारी हे ड्युटी टाकणे व वाहन देण्यासाठी फार त्रास देत असल्याचा आरोप करून चालक उल्हास उंडेगावकर (बैच न.20025) यांनी आज गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी पहाटे 6.30 वाजण्याच्या दरम्यान आगारातील वाहन परिक्षक यांच्या दालनात स्वत:च्या हाताची नस ब्लेडने कापून घेतली. येथील ग्रामाण रूग्णालयात प्रथम औषधोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना परभणीला हलविण्यात आले.

आपली ड्युटी बजावण्यासाठी चालक उंडेगावकर आज पहाटे 6.15 वाजता आगारात आले. मार्गावर जाण्यासाठी वाहन घेण्याच्या कारणावरून वाहन परिक्षक संजिव भांबळे यांच्यासोबत किरकोळ बोलाबोली झाली. ड्युटी टाकण्यासाठी व वाहन देण्यासाठी मला नेहमीचाच त्रास होत आहे असा आरोप करून वाहन परिक्षक यांच्या दालनात स्वत:च्या हाताची नस चालक उंडेगावकर यांनी कापून घेतली. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले. 

परभणी बस स्थानकाजवळील एका खासगी रुग्णालयात चालक उंडेगावकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सायंकाळी त्यांच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी उल्हास उंडेगावकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ड्युटी आणि वाहन देण्यावरून वादावादी झाली होती. त्यानंतर वैतागलेल्या गुंडेगावकर यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. 

मागील दीड ते दोन वर्षांपासून जिंतूर एसटी आगारातील भगवानराव ढाकणे आणि चिपले हे दोन ड्युटी लावणारे अधिकारी चालक उल्हास उंडेगावकर यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप उल्हास उंडेगावकर यांच्या वडिलांनी केला आहे. तसेच उल्हास गुंडेगावकर यांनी देखील परभणीच्या नवामोंढा पोलिसांना याप्रकरणी जबाब दिला आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.






Post a Comment

0 Comments