Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सियाचीन ग्लेशियरवर पहिले पाऊल ठेवणारे लष्करी अधिकारी कर्नल नरेंद्र बुलकुमार यांचे निधन





दिल्ली ➡️ जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर पहिले पाऊल ठेवणारे भारतीय सैन्याचे लष्करी अधिकारी कर्नल नरेंद्र बुलकुमार यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या कर्नल नरेंद्र यांच्यावर दिल्लीतील आर्मी रिसर्च हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गर्यारोहण मोहिमेदरम्यान कर्नल नरेंद्र बुल कुमार हे सियाचिन ग्लेशियरवर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे लष्करी अधिकारी होते. मोहिमेवरुन परतल्यानंतर त्यांनी भारताच्या सैन्य आणि राजकीय नेतृत्वाला सियाचिन ग्लेशरचे सामरिक महत्वं समजावून सांगितले होते. गिर्यारोहक म्हणून अनेकदा सियाचीन ग्लेशियरवर गेल्याने त्यांनी इथली अनेक निरिक्षण नोंदवून ठेवली होती. ही निरिक्षणे 1983 साली 'इलिस्ट्रेटेड विकली' या साप्ताहिकात छापून आली होती.


हिमालयातील या सर्वांत उंचावरील पूर्णपणे गोठलेल्या परिसराच्या स्थितीचा आढावा घेणारा हा पहिलाच सार्वजनिक लेख होता. कर्नल कुमार यांनी गिर्यारोहणादरम्यान तयार केलेले नकाशे आणि व्हिडिओ याच्या मदतीने भारतीय लष्कराने 1984 मध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केले होते. या मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने सियाचीन ग्लेशियर सुरक्षित केले होते. पाकिस्तानकडून होणाऱ्या आक्रमकतेपासून प्रतिबंधित केले होते.

आपल्या या उत्तुंग कामगिरीसाठी 1965 साली कुमार यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले. तर लष्कराने त्यांना तिन्ही दलांच्यावतीने परम विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना कर्नलपदी बढती देण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना लष्कराचे किर्ती चक्र आणि अतिविशिष्ट सेवा मेडलनेही गौरविण्यात आले होते. सियाचीन येथील बटालियन मुख्यालयाचे नंतर त्यांच्या नावावरुन 'कुमार बेस' असं नामकरण करण्यात आले.

जन्मतारीख: डिसेंबर, १९३३
जन्मस्थळ: रावळपिंडी, पाकिस्तान
मृत्यूची तारीख: ३१ डिसेंबर, २०२०
युद्धे आणि लढाया: ऑपरेशन मेघदूत
सेवा/शाखा: भारतीय लष्कर
पुरस्कार: परम विशिष्ठ सेवा पदक




Post a Comment

0 Comments