प्राप्त माहितीनुसार अशी की, पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात राहणारी प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय-20) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी सर्पदंशानं निधन झालं होतं. ती गावात आईसोबत राहत होती. अल्पभूधारक असल्यानं दोन्ही मायलेकी किराणा दुकानावर आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र, प्राजक्ताची गावातील 03 तरुण गुंड नेहमी छेड काढत होते. एवढेच नाही तर तिच्या मोबाईलवर फोन करून तसेच मेसेज पाठवून तिला त्रास देत होते. अश्या प्रकारे सतत होणारी छेडछाड आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं प्राजक्तानं 23 ऑक्टोबरला कीटकनाशक प्राशन केलं होतं.
पण उपचार सुरू असताना प्राजक्ताचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर नणुंद्रे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावानं संशयित आरोपींच्या घरांवर हल्ला केला. घरात घुसून नासधूस केली केली. या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दाखल झालेल्या नंतर संशयित आरोपी अजित पाटील या तरुणाने घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
0 Comments