परभणी ➡️ सेलू शहरातील श्रीराम कॉलनीतील श्री प्रकाशराव नारायणराव कुलकर्णी (वाकडीकर) यांचे वयाच्या 69 व्या वर्षी 28 ऑक्टोबर (बुधवार) 2020 रोजी रात्री 7.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते आदर्श महाविद्यालय हिंगोलीचे प्राध्यापक श्री कालिदासराव नारायणराव कुलकर्णी (वाकडीकर) आणि लालबहादूर शास्त्री विध्यालाय लिंगसा येथील सहशिक्षक श्री सुनीलराव नारायणराव कुलकर्णी (वाकडीकर) यांचे ते बंधू होते.
त्यांच्यावर तहसील रोडवरील वैकुंठधाम येथे 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सेलूतील केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक संचालक होते. त्यांचे शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा 2 मुली, सुन, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
0 Comments