विलास नवनाथ भोळे हे मुकुंदनगर भागात पत्नी रोहिणीसोबत राहतात. काही वर्षांपूर्वी दोंघाच लग्न झालं होत. सुरुवातीला काही वर्षे आईवडिलांच्या सोबत हे जोडपं राहत होते. पण घरच्यांशी पटत नसल्याच्या कारणावरून ते दुसरीकडे राहत होते. पती दिवसभर काम करण्यासाठी जात असे.
त्यांनी गणेश गोरे इथे काय करतो असे विचारले. त्यावरुन दोघांनी विलास यांना शिवीगाळ व मारहाण केली. याचा राग आल्याने विलास हे वडील नवनाथ त्रिंबक भोळे यांच्या घरी आले. घरात माणसं इकडे तिकडे गेल्यावर खोलीत जाऊन गळफास घेतला. बंद खोलीत हा काय करतो हे बघण्यासाठी गेले असता त्यांना विलासचा मृतदेह आढळला. ही घटना घडल्यानंतर नवनाथ भोळे यांनी मंगळवारी सायंकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. सून रोहिणी व तिचा प्रियकर गणेश गोरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments