जिंतूर ➡️ शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या मंदार पेट्रोल पंपाजवळ आंध्र प्रदेशातून सोलापूरकडे मालवाहतूक करणा-या ट्रकच्या क्लीनरचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावल्याने फोन करूनसुद्धा रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
जिंतूर -औंढा रोडवर आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून मासे भरलेला जड मालवाहतूक ट्रक क्रमांक A.P-16 T.H. 1487 या वाहनांचा चालक व क्लीनर विश्रांती घेण्यासाठी रविवारी रात्री थांबले होते. त्यातच क्लीनर सुब्बाराव (वय 40 वर्ष) याची मध्यरात्री 2.30 वाजता प्रकृती खालावली होती. त्यामुळे वाहन चालक सूर्यकिरण नागेश राऊत (रा.विजयवाडा आंध्रप्रदेश) यांनी रूग्णवाहीकेला अनेक वेळा फोन लावून सुध्दा रूग्णवाहीका आलीच नाही. परिणामी क्लीनरला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप वाहन चालक राऊत यांनी केला आहे. दुपारी पोलीस अधिकारी दंडगव्हाळ व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच न.प.चे स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस व स्वच्छता कर्मचारी यांनी शव खाजगी ट्रॅक्टरने शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला? हे वैद्यकीय रिपोर्ट आपल्यावर समजू शकेल.
- Home
- PARBHANI NEWS
- _JINTUR NEWS
- _PALAM NEWS
- _SELU NEWS
- _PURNA NEWS
- _PATHRI NEWS
- _MANAWAT NEWS
- _SONPETH NEWS
- _GANGAKHED NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- _PUNE NEWS
- _JINTUR NEWS
- _PATHRI NEWS
- _SONPETH NEWS
- _MANAWAT NEWS
- _GANGAKHED NEWS
- _PURNA NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- __PUNE NEWS
0 Comments