परभणी ➡️ परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी दिनांक दि.31 रोजी शहरातील 13 केंद्रावर 308 व्यापा-यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये 294 जण निगेटिव्ह आले असून 14 जण पॉझिटीव्ह आले.
कल्याण नगरातील आयएमए हॉल येथे 48 जणांची तपासणी करण्यात आली यात 1 पॉझीटीव्ह आढळले. नानलपेठ येथील बाल विद्या मंदिर सेंटरवर 26 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 1 जण पॉझीटीव्ह आढळले. जायकवाडी येथील महानगरपालिका रुग्णालयात 35 जणांची तपासणी करण्यात आली तेथे 5 जण पॉझिटीव्ह आढळला. सीटी क्लब येथे 44 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 4 जण बाधित आढळले. नुतन विद्यालय येथे 13 जणांची तपासणी करण्यात आली. साखला प्लॉट येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात 21 जणांची तपासणी करण्यात आली. एक जण पॉझिटीव्ह सापडला. मार्केट कमिटी येथे 19 जणांची तपासणी करण्यात आली.तेथे 1 जण पॉझिटीव्ह सापडला. जागृती मंगल कार्यालयात 9 जणाची तपासणी करण्यात आली. कोठारी कॉम्प्लेक्स येथे 18 जणांची तपासणी करण्यात आली. एक जण पॉझिटीव्ह आढळला. खानापूर येथील आरोग्य केंद्रात 5 जणांची तपासणी करण्यात आली. खंडोबा बाजार येथील आरोग्य केंद्रात 40 जणांची तपासणी केली. इनायत नगर येथील आरोग्य केंद्रात 11 जणांची तपासणी केली. बॅटमिंटन हॉल येथे 19 जणांची तपासणी करण्यात आली.
0 Comments