Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आ.विक्रम काळे यांना निवडून द्या - आ.सतीश चव्हाण





पालम ➡️ आमदार विक्रम काळे शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने ते सभागृहात मांडत असतात. त्यांच्यासोबत सन 2008 पासून मी विधी मंडळात काम करत आहे. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आ.विक्रम काळे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पुन्हा विधी मंडळात काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.(vnsnews-24, feature, palam) 




औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आज दि.19 लोहा, पालम, गंगाखेड, परळी येथे आ.सतीश चव्हाण यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालम येथील ममता विद्यालयात आयोजित सभेत बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शासनस्तरावर जोमाने पाठपूरावा सुरू केला. 





मात्र कोरोनासारख्या नव्या संकटाला सरकारला सामोरे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत 23 जून 2022 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासकडे आम्ही शाळा अनुदान, जुनी पेन्शन, शिक्षक-प्राध्यापक भरती यासार‘या महत्वाच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली. त्यामध्ये शाळा अनुदान व जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सम्यक समितीच्या अहवालासह मंत्रीमंडळासमोर आणा, सरकार निर्णय घेईल असे निर्देश अजितदादा पवार यांनी दिले होते. 




परंतु काही दिवसांमध्ये आपणास अनपेक्षीत सत्ता बदलाला सामोरे जावे लागले. केंद्रातील सरकार हे फक्त उद्योगपतींचे आहे. आज महागाई, बेरोजगारी त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या मालाला भाव नसणे या सार‘या महत्वाच्या समस्यांपुढे सर्वसामान्य जनता, बळीराजा आज हवालदिल झाला आहे. मात्र सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याचे सांगत आघाडीचे सरकार असताना महागाईवर बोलणारे आता मुग गिळून गप्प असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. शिक्षकांचे अनेक प्रश्न आज शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतीचे मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केले.




याप्रसंगी वसंतराव सिरस्कर, तुषार गोळेगावकर, इमदाद खा पठाण, प्रभाकर रिरस्कर, केशवअण्णा दुधाटे, इंजि.नारायण चौधरी, हनुमंत कंधारकर, प्रसाद बोरफळे, मोतीराम शिंदे, गोविंद कदम आदींची उपस्थिती होती. तर गंगाखेड येथील सभेप्रसंगी संत जनाबाई शिक्षण  संस्थेचे सचिव ऍड.संतोष मुंढे, ऍड.मिथिलेश केंद्रे, युनूस शेख बाळसाहेब राखे, गोविंद चोरघडे आदींची उपस्थिती होती.(vnsnews-24, feature, palam) 







Post a Comment

0 Comments