Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वीज दरवाढी विरोधात परभणी भाजपा महानगरचे आंदोलन





परभणी, दि. १० जुलै :- परभणी लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर मिटर रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीने परभणी शहरासह जिल्ह्यातील हजारों ग्राहकांना एप्रिल व जून या तीन महिन्यांचे  सरासरी युनिटच्या आधारे अव्वा की सव्वा रक्कमेची  वीज बिले पाठविले आहेत. कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी परभणी भाजपा महानगरच्या वतीने महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १० जुलै रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
 वीज वितरण कंपनीने माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याचे कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना यातच वीज वितरण कंपनीने गेल्या आठवड्याभरापासून या ग्राहकांना सरासरी युनिटच्या आधारे अव्वा की सव्वा वीज बिले पाठवली आहेत. परभणी तालुक्यातील तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथाळा,जोडपरळी या गावात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील वीज खांबे,तारे पडली आहेत आज रोजीपर्यंत या गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले तारे,वीज खांबांचे कामे करण्यात आले नाहीत. बोबडे टाकळी येथील ब्रेकर नादुरुस्त असल्यामुळे सबस्टेशन बरोबर चालत नाही या भागातील जवळपास 15 गावे एकाच फिडरवर जोडल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत नाही. मागील एका महिन्यापासून ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नाही.
    राज्य सरकार मधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती तसेच नंतर १०० युनिट पर्यंत माफी देण्यात येईल असेही सांगितले होते. परंतू घोषणेची अंमलबजावणी न करता उलट हजारो रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने वीज बिल माफ करावे या मागणीसाठी आज परभणी भाजपा महानगरच्या वतीने राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढीव वीज बिले माफ करावी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या, शेतक-यांना डीपी उपलब्ध करून देण्यात यावेत या मागणीचे निवेदन महावितरणचे  मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. आंदोलनात परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे,मंडळाध्यक्ष सुनिल देशमुख,भीमराव वायवळ,सुहास डहाळे,विजय दराडे,भाजपा तालुकाध्यक्ष संदीप जाधव, भाजपा पदाधिकारी संजय शेळके,संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, अतिक पटेल,प्रशांत सांगळे, प्रभावती अन्नपुर्वे, विजय गायकवाड, चंद्रकांत चौधरी,सुधीर कांबळे,भालचंद्र गोरे,अॅड.गणेश जाधव,संजय कुलकर्णी,प्रदीप तांदळे,रामदास पवार,पूनम शर्मा,शिवाजी बोबडे, अच्युत रसाळ,पुरभाजी जावळे,दत्ता दौंड,प्रकाश घाडगे,संदीप बोरकर, डॉ.दिनेश कांबळे, बाळासाहेब शिंदे, जिजा थोरात,संतोष जाधव, सिकंदर खान, रोहित जगदाळे, आकाश पवार, अनंता गिरी, नीरज बुचाले,विष्णू शिंदे आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments