Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/पाथरीच्या खाजगी शाळेतील सेवकाचे 9 दिवसांपासून उपोषण सुरू






परभणी ➡️ पाथरी येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या काही महिन्यांपासून सेवक पदावर काम करत असलेले मनोज नंदकुमार बैस यांनी वैयक्तीक मान्यता देऊन तात्काळ वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करीत 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी उपोषणस्थळी भेट देवून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

अनुकंपाधारक म्हणून मनोज बैस यांची नियुक्ती

याबाबत शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोज नंदकुमार वैस (सेवक) हे पाथरी येथे नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनेक दिवसापासुन विना वेतन कार्यरत आहेत. त्यांची सेवा व मुख्याध्यापक यांनी सांगितलेली कामे ते प्रामाणिकपणे करत आहे. त्यांचे वडील कै. नंदकुमार श्रीरंगराव बैस हे याच शाळेत सेवक पदावर कार्यरत होते. 12 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांंच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. यामुळे  त्यांच्या जागेवर अनुकंपाधारक म्हणून मनोज बैस यांची नियुक्ती करण्यात आली. 



माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दखल नाही
त्यांच्या म्हणण्यानुसार वैयक्तीक मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक दिवसापासुन प्रलंबित आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या वैयक्तीक मान्यतेचा व वेतनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे अनेकदा आश्वासन देऊनही वैयक्तीक मान्यतेचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच या कार्यालयास अनेकदा तोंडी व लेखी विनंती करून सुद्धा कसल्याही प्रकारची निवेदनाची व विनंतीची दखल घेतली नाही. 




उपोषणाला 9 दिवस पुर्ण झाले
त्यामुळे जिल्हिधिकारी कार्यालयासमोर दि.24 जानेवारीपासून मनोज बैस हे कुटुंबासह अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला 9 दिवस पुर्ण झाले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दोन दिवसांपुर्वी डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून त्यांना सलाईन लावण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली मात्र कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने उपोषण सुरूच ठेवले असल्याचे मनोज बैस यांनी सांगितले.




या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांना विचारले असता, मनोज बैस हे पाथरी येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात उपोषणास बसले असून त्यांना मी प्रत्यक्ष जावून भेटलो व सविस्तर चर्चा केली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंतीदेखील केली. माझ्याकडे हिंगोलीचा पुर्णवेळ कार्यभार असून परभणीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला आहे. आमच्या कार्यालयाकडे आलेला त्यांचा प्रस्ताव अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांना परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यास सांगितले असून श्री.बैस यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्याचेही कळविले आहे.








Post a Comment

0 Comments