Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/श्री शिवाजी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा





परभणी - येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी (राष्ट्रीय छात्रसेना) विभागाच्या वतीने बुधवार (ता.२६) रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी शहीद जवानांना अभिवादन केले. (vnsnews24, feature ) 




विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाचे महत्व, सैन्यांची यशोगाथा तसेच पराक्रम समजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते कारगिल युद्धातील शहीदांस श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.





सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी कारगिल युद्धातील परमवीरचक्र विजेते सैनिकांच्या जीवनावर आधारित भितीपत्रकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे तसेच एनसीसी प्रमुख  लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन गडदे, शिवम बेद्रे, मिरज केदारी, गजानन पवार आदींनी पुढाकार घेतला.







Post a Comment

0 Comments