Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांची इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्ती





परभणी - येथील शारदा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांची नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी यापूर्वी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक म्हणून कार्य केले आहे. (vnsnews24, feature) 


त्यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे 2019 मध्ये सम्पन्न झालेल्या 'इंद्रधनुष्य' या राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी राजभवन तर्फे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शारदा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आहे. 



त्यांच्या या नियुक्ती बद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, प्रा. डॉ. सौ. व्ही. डब्लू. सूर्यवंशी, प्रा. ए. बी.टेकुळे, मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.









Post a Comment

0 Comments