Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  'दगडूशेठ दर्शन ते मेट्रो उद्घाटन', जाणून घ्या मोदींच्या पुणे दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक





पुणेलोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१ ऑगस्ट)पुण्यात येणार आहेत. ते तब्बल दीड वर्षांनी पुण्यात येत आहेत. (vnsnews24, feature ) 




पंतप्रधान यावेळी पुणे मेट्रो फेस-१ चे उद्घाटन करणार आहेत. ही मेट्रो फुगेवाडी स्टेशन ते सिविल कोर्ट स्टेशन (शिवाजीनगर) या मार्गावर धावणारी आहे आणि दुसरा मार्ग गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक या दरम्यान असणार आहे.






त्यांच्या या भेटीदरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेल्या १२८० आणि पुणे महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेल्या २६५० पेक्षा जास्त घरं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या ११९० घरांचे आणि पुणे महानगर विकास मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० घरांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीचे पूर्ण वेळापत्रक

  • सकाळी १०:१५-लोहंगाव विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन

  • सकाळी १०:५५-कृषी महाविद्यालय,पुणे या ठिकाणी हेलिपॅड येथे आगमन

  • सकाळी ११ वाजता- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

  • सकाळी ११.४५- लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी एसपी कॉलेज या ठिकाणी पंतप्रधान येतील

  • दुपारी १२.४५- विस्तारित मेट्रो लाईन्सचे उद्घाटन

  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे आणि पिपंरीतील चार हजार सदनिकांचे उद्घाटन

  • पुणे महानगर विकास मंडळाच्या सहा हजार घरांचे भुमीपुजन

  • दुपारी १.४५ ते २.१५ यादरम्यान आरक्षित वेळ

  • दुपारी २.२५ - कृषी महाविद्यालय , पुणे येथील हेलिपॅडवर येतील

  • २.५५- दिल्लीसाठी रवाना






Post a Comment

0 Comments