Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ बसमध्ये प्रवाशी महिलाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक




 


पुणे - पीएमपीतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिला मूळच्या सोलापूरच्या असूनत्यांच्याकडून 6.50 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरी करण्यासाठी त्या पुण्यात यायच्याअशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. (vnsnews24, feature ) 






करुणानिधी सिद्धराज जिनकेरी (वय 25)श्वेता उर्फ सरिता काशीनाथ पाटील (वय 24दोघी सध्या रा. सोलापूरमूळ रा. तारफेलगुलबर्गाकर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. स्वारगेट पीएमपीएसटी स्थानक परिसरात महिलांचे दागिने चोरीला गेले होते. महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. स्वारगेट ते नागपूर एसटी बसमध्ये प्रवेश करताना एका प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली होती. या बाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.





स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदीप घुलेअनिस शेख गस्त घालत होते. त्यावेळी खबऱ्याने दागिने चोरणाऱ्या दोन महिलांची माहिती घुलेशेख यांना दिली. त्यानंतर महिला पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले. दोघींकडून नऊ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. दागिन्यांची विक्री गुलबर्गा येथील एका सराफाला केल्याची महिती जिनकेरी आणि पाटील यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटीलसहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरेगुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधवसहायक निरीक्षक प्रशांत संदेउपनिरीक्षक अशोक येवलेपोलीस कर्मचारी शिवा गायकवाडफिरोज शेखसंजय पवारमुकुंद तारुदीपक खेंदाड आदींनी ही कारवाई केली.






Post a Comment

0 Comments