Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नानगावम येथे शेतमजूर वर बिबट्याचा हल्ला






पुणे -  दौड तालुक्यातील नानगावम येथील मांगोबामाळ खळदकर वस्ती येथे रहात असलेले शेतमजूर काशिनाथ बापू निंबाळकर (65) यांच्यावर शनिवार दि.29 रोजी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. (vnsnews24, feature ) 




या हल्ल्यात शेतमजूर काशिनाथ निंबाळकर हे जखमी झाले असुन त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान सांभाळल्याने शेतमजूराचे प्राण वाचले.




या भागात गेली अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.अनेकदा छोट्या मोठ्या जनावरांवर बिबट्यांनी हल्ले केले असून अशा हल्ल्यात प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र माणसावर पहिल्यांदाच असा हल्ला झाल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





Post a Comment

0 Comments