Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सारथी संस्थाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण





जिंतूर - कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परभणी जिल्ह्यातील एम.के.सी.एल.च्या निवडक केंद्रावर मोफत संगणक व व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  साई कॉम्प्युटर हुतात्मा स्मारक जिंतूरचे संचालक महेश देशमुख यांनी केले आहे. (vnsnews24, feature ) 



छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सारथी संस्थेचा उपक्रम नॉलेज कापोरेशन लि. पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 'सारथी' संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला असून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या दहावी पास १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवाराकरिता  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तालुकास्तरापर्यंत सारथी संस्थेमार्फत निःशुल्क (मोफत) व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी सारथी लक्षित गटातील पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 



सारथी सदर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि., पुणे या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून परभणी जिल्हातील 'एमकेसीएलच्या निवडक अधिकृत अध्ययन केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, आयटी स्किल्स हे दोन अभ्यासक्रम शिकवले जाणार असून इतर दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. 





त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स शिकता येतील व स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. सदर प्रशिक्षणासाठीविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन साई कॉम्प्युटर हुतात्मा स्मारक जिंतूरचे संचालक महेश देशमुख यांनी केले आहे.







Post a Comment

0 Comments