Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी हिताचे - प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव




राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा॑र्तगत विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन

परभणी -  देशात लागू झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे विद्यार्थी हिताचे व कौशल्याधिष्ठित असून या धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासह सर्वांगीण विकास हा आहे. या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल होऊन कौशल्याधिष्ठित युवक निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले.  (vnsnews24, feature ) 





परभणी शहराती ल श्री शिवाजी महाविद्यालयात शुक्रवारी (दि.२८) रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह निमित्ताने आयोजित विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.तुकाराम फिसफिसे आदी उपस्थित होते.

 



विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात झपाटयाने बदल  होणार आहेत. येणाऱ्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू मानला आहे. एकाच वेळी विद्यार्थ्यांस अंतरविद्याशाखीय विषयांचे शिक्षण घेता येणार आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कुशल युवकांना नौकऱ्या देणार आहेत. अशावेळी युवकांनी आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षकांना देखील नवीन धोरणांला अनुसरून शैक्षणिक पद्धतीत बदल करावा लागेल. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 



सदरील कार्यक्रमात विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. उपप्राचार्य उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.उत्कर्ष किट्टेकर,माजी विद्यार्थी संकेत गाडेकर, सुदाम भोसले आदींनी मनोगते मांडली.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे तर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन डॉ.जयंत बोबडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ सुभाष लोणकर,डॉ.सुरेंद्र येनोरकर, डॉ.एम.एस. परतुरकर, डॉ.संतोष कोकीळ,प्रा.अभिजित भंडारे, अशोक मस्के, बाळकृष्ण पोखरकर, बालासाहेब बारहाते,एकनाथ देवकर, विजय नल्लामडगू, साहेब येलेवाड, सागर खुणे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments