Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावांमधे तात्काळ बोटींची सुविधा





जिल्हाधिकार गोविॅद बोडके यांनी पूर परिस्थितीची केली प्रत्यक्ष पाहणी

पालघर - पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे काही गावातील संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी पूल देखील वाहून गेले होते. अशा गावांतील स्थानिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी तात्काळ बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोविॅद बोडके यांनी वाडा, मोखाडा या तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.(vnsnews24, feature ) 


पालघर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहिर केला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष नद्या व धरणांना भेट दिली. प्रथमत: धामणी धरणाच्या विसर्गाबाबतची त्यांनी माहिती घेतली व धरणाच्या खालील भागातील गावांना सर्तक राहण्याचा सूचना त्यांनी केल्या.


मोखाडा तालुक्यातील किर्लोद येथील नदीला भेट दिली. या ठिकाणी बोट उपलब्ध करून देण्यात आली होती. या बोटीची त्यांनी पाहणी केली व पाण्याचा प्रवाह वाढलेला असेल अशा परिस्थितीतही बोट सुरक्षित चालविता यावी यासाठी बोट चालविण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित व्यक्तीला बोट चालवायला लावली. जिल्हाधिकारी श्री बोडके आणि वाडा, प्रांताधिकारी,भवानजी आगे पाटील यांनी स्वत: यातुन प्रवास केला. NDRF यांनी दिलेल्या प्रशिक्षणाची गुणवत्ता तपासली. ही बोट या गावाला देण्यात आली आहे.



या भेटीदरम्यान तहसिलदार मोखाडा, मयुर खेंगले, तहसिलदार विक्रमगड चारुशिला पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, NDRF ची टिम सदर ठिकाणी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी वाडा तालुक्यातील नद्यांच्या पातळीची पाहणी केली व या नदीकाठी बसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा तहसिलदार यांच्या मार्फत दिला. सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ठिकाणी राहण्याबाबत आणि आवश्यक ती मदत करण्याच्याही बोडके यांना यावेळी सूचना दिल्या.







Post a Comment

0 Comments