Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ‍जिंतूरात मणिपूर घटनाच्या विरोधांत आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा




जिंतूर - मणिपूर राज्यात आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणी मणिपुर सरकार तात्काळ बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा या मागणीसाठी भारतीय आदिवासी पँथर संघटनाकडून मोर्चा आज काढण्यात आले. तसेच राष्ट्रपत‍ि द्रोपदी मुर्म यांना निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. 






या निवेदनात म्हटले गेले क‍ि मणिपूर येथे तीन महिन्यापासून मणिपूर राज्य होरपळून निघाले आहे. मागील आठवड्यात मात्र हिंसाचाराचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना सोशल मिडीयावर प्रसिध्द होत आहे.यामध्ये तीन आदिवासी महिलांना नग्न करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिलांना पोलीसांच्या ताब्यातून पोलीसांनी हिंसक जमावाच्या स्वाधीन केल्याचे दिसू येत आहे. 



त्यामुळे मणिपूर राज्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नाही म्हणून मणिपूर सरकार तेथील कारभार चालविण्यासाठी योग्य नसल्यामुळे ते तात्काळ बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी व दोषी हिंसक जमावावर योग्य ती कठोर कार्यवाही करून त्यातील मुख्य दोषी आरोपीनां फाशींची शिक्षा देण्यात यावी अन्यथा अशी परिस्थिती राहिल्यास देशातील इतर राज्यात अशा प्रकारचा हिंसाचार वाढेल व नंतर संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  होईल. 





या घटनाच्या विरोधात आज आदिवासी समाजकडून भारतीय आदिवासी पँथर संघटनाच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर - येलदरी रोड येथील साखरतला मार्ग, बिरसा मुंडा चौक येथून तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आले. या मोर्चात संस्थापक अध्यक्ष अँड. प्रशांत बोडखे, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद मंजीराम माघाडे सोबत हजारोंच्या संख्तेत आदिवासी समाजाच्या महिला व पुरुष सहभागी झाले होते.





Post a Comment

0 Comments