Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणीत "कोटपा’ अंतर्गंत ३६ जणांवर दंडात्मक कारवाई





परभणी
- पान टपरी व सार्वजनिक स्थळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ३६ जणांवर कोटपा कायद्याअंतर्गत जिंतूर रोड, अपना कॉर्नर व धार रोड परिसरामध्ये कारवाई करत दोन दिवसात त्यांच्याकडून ८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (vnsnews24, feature) 


जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. जयश्री यादव व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणीं तंबाखूविरोधी धाडसत्र आयोजित(vnsnews24, feature)  करून कोटपा कायदा कलम ४ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व पान टपरीधारक ३६ लोकांकडून हा दंड वसूल करण्यात आला.




सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखू-गुटखा खाणे व बाळगणे विरोधी कायदा आहे. कलम ५ नुसार, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करण्यावर बंदी आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि वापरामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, तसेच विविध साथीचे पसरण्यास सुरुवात होते. या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. रुपाली रणविरकर, मानसतज्ज्ञु केशव गव्हाणे, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इजलकर, हेड कॉन्स्टेबल श्री. मुरकुटे, पोलीस नाईक भरीराथ गवळी व अंबादास चव्हाण, शिपाई श्री. केदारी, श्री. मागनाळे, शिंदे, होमगार्ड अनिरुद्ध काळे व राईसोद्दीन कादरी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे विभागीय अधिकारी अभिजीत सांघाई संयुक्त पथकाने ही कारवाई केली.




Post a Comment

0 Comments