Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ अंगणवाडी मदतनीस पदभरती प्रक्रिया पारदर्शी, आमिष दाखविल्यास संपर्क साधण्याचे आवाहन






वर्धा - महिला व बाल विकास विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) अंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पद भरतीत निवड करून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करीत असल्यास किंवा आमिष दाखविण्यात येत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे (vnsnews24, feature ) 





अंगणवाडी मदतनीससाठी स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, सामाजिक आरक्षण, विधवा, अनाथ, अंगणवाडी सेविका, मदतनीस पदाचा अनुभव या निकषाच्या आधारे त्रयस्थ पडताळणी समितीद्वारे वस्तुनिष्ठ गुणदान होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा, मुलाखत घेतली जाणार नाही. त्रयस्थ पडताळणी समितीमार्फत गुणदान झाल्यानंतर सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यावर हकरती, आक्षेप करीता 10 दिवसाची मुदत असल्याने भरती प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे पूर्णत: पारदर्शक होणार आहे. याची अर्जदारांनी दखल घ्यावी.





पदभरती ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने होणार असून शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसारच पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस पदाकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांशी संपर्क करुन त्यांची निवड करुन देण्याचे आमिष, भुलथापा देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 




ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यांच्याशी अशा कोणत्याही व्यक्तीने संपर्क केल्यास किंवा असे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) येथील कार्यालय प्रमुखाशी संपर्क साधावा व अशा भुलथापांना बळी पडून आपली फसवणूक करुन घेऊ नये, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार कटरे यांनी कळविले आहे.





Post a Comment

0 Comments