Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे आज उद्घाटन




पुणे - मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आ मंगळवारी (दि. 1) दुपारी साडेबारा वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच 2 तासांत दुसर्‍या टप्प्यातील सेवा प्रवाशांकरिता सुरू होणार आहे.(vnsnews24, feature ) 




मेट्रोची पहिल्या टप्प्यातील पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर आज दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटनसुध्दा तेच करणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यावर दर 10 ते 15 मिनिटांनी या दोन्ही मार्गिकांवरील मुख्य स्थानकांवरून गाड्या सुटणार असून, तिकीट दर 30 ते 35 रुपयांच्या घरात असणार आहे.



अशी आहे तिकिटात सवलत

पीसीएमसी ते वनाज, असा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल. तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी 30 रुपये भाडे असेल. वनाज ते रुबी हॉल यासाठी 35 रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत असणार आहे. शनिवारी, रविवारी सर्व नागरिकांसाठी 30 टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे.



अशी आहे मेट्रोची सेवा

  • पहिला टप्पा : (उद्घाटन : 6 मार्च 2023)
  • वनाज ते गरवारे कॉलेज : 5 किलोमीटर
  • स्थानके : वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज
  • पीसीएमसी ते फुगेवाडी : 7 किलोमीटर
  • स्थानके : पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी





अशी आहे मेट्रोची सेवा

  • पहिला टप्पा : (उद्घाटन : 6 मार्च 2023)
  • वनाज ते गरवारे कॉलेज : 5 किलोमीटर
  • स्थानके : वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज
  • पीसीएमसी ते फुगेवाडी : 7 किलोमीटर
  • दुसरा टप्पा : (उद्घाटन : 1 ऑगस्ट 2023)
  • गरवारे कॉलेज ते रुबी हॉल स्टेशन : 4.7 किलोमीटर
  • स्थानके : डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (आरटीओ), रुबी हॉल क्लिनिक स्टेशन
  • फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट : 6.9 किलोमीटर
  • स्थानके : फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट.

मेट्रोचे तिकीट दर
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट - 30 रुपये
वनाझ ते पीसीएमसी - 35 रुपये
रुबी हॉल ते पीसीएमसी - 30 रुपये
पीसीएमसी ते पुणे रेल्वे स्टेशन - 30 रुपये





Post a Comment

0 Comments