Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सर्वांच्या प्रत्यातून महाराष्ट्रीयन खेळास सरकार पुढे मांडू : डॉ.संतोष निमुनकर





टेनिस व्हॉलीबॉल संघटनेची राज्य वार्षिक सभा पनवेल येथे संपन्न

परभणी ➡️  टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक संस्था पनवेल यांच्या वतीने दि. ११ जून रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. (vnsnews24, feature ) 


या पुर्वी राज्य संघटनेचे पुरस्कार वितरण सोहळास डॉ. संतोष निमुनकर (ओ.एस.डी. शालेय शिक्षण मंत्री) म्हणाले की महाराष्ट्राच्या मातीतला निरोगी व तंदुरुस्त व भरपूर व्यायाम देणारा टेनिस व्हॉलीबॉल खेळ डॉ. व्यंकटेश वांगवाड सरांनी निर्माण केला आहे. आज या खेळास रौप्यमहोत्सवी वर्षात प्रदानर्पन करीत आहे. या क्रीडा प्रकारास केंद्रीय मंञालय नी प्राथमिक स्तर मान्यता दिली आहे. याकरिता सर्वांच्या प्रत्यातून महाराष्ट्र सरकार पुढे मांडून खेळास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहू. 





वार्षिक सर्वसाधारण सभेत , टेनिस व्हॉलीबॉल सभेच्या अहवाल चे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संतोष निमुनकर ( ओ.एस.डी शालेय शिक्षण मंत्री)  सुरेश रेड्डी क्यातमवार (राज्य अध्यक्ष), डॉ ‌व्यंकटेश वांगवाड (संस्थापक अध्यक्ष) आनंद खरे (महासंघाचे अध्यक्ष),  गणपतराव बालवडकर (राज्य चेअरमन) गणेश माळवे (राज्य सचिव), डॉ.धनंजय बेडदे( संस्था अध्यक्ष) श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एन.डी.पखाले , डॉ. दिनेश शिगारम राज्य कोषाध्यक्ष रामेश्वर कोरडे, अशोक शिंदे (विभागीय सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.  




टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन वतीने वर्षे आतील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा उत्कृष्ट संघटक पुरस्कार परभणी जिल्हास सतिश नावाडे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आशिष ओबेरॉय नवी मुंबई यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन देण्यात आला. 

 


२०२३-२४ शैक्षणिक वर्षात टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक यांचे अमृत महोत्सवी वर्ष व राज्य संघटनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावे असे मत राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार यांनी मांडले ‌.

 


सभेत या वर्षात राज्य संघटनेचे राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल कार्यक्रम ठरविण्यात आला ‌ यात सब- ज्युनिअर/ज्युनिअर स्पर्धा ऑगस्ट महिन्यात नागपूर, तर युथ व मिनी गटाच्या वाशिम , तर सिनियर गटाच्या जळगाव, तर शालेय राज्य टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा अकोला येथे होणार आहेत अशी माहिती राज्य सचिव गणेश माळवे यांनी दिली. 



सभेस प्रफुल्ल कुमार बन्सोड (पुणे )तेजस पाटील (उपनगर) शेख के.जे (बीड), संदिप भोसले (पुणे),किरण घोलप (नाशिक) गणेश पाटील ( जळगाव), अंकुश जाधव ,अनिल घुगे, दर्शन शिंदे, (मुंबई) आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments