Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पुलावरून कार कोसळून दोघेजण गंभीर जखमी, पिंपरी गीते जवळील घटना





जिंतूर  ➡️ जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कडे  जात असताना पिंपरी गिते गावाजवळ असलेल्या  पुलावरून कार खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.  ही घटना सोमवारी (दि.१२) सकाळी ११ वाजेच्या  सुमारास घडली. (vnsnews24, feature ) 





जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक असलेले अशोक वैद्य (वय ५७ वर्षे)  व बोरी येथील जिल्हा परिषदेला सहशक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती अशोक वैद्य (वय ५० वर्षे)  हे आपल्या टाटा विस्टा कार ( एमएच-  २२- यु - २९५८ ) ने छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलाकडे जात होते. 




पिंपरी गीते गावाजळील पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाने साईड न दिल्याने  त्यांची कार उजव्या बाजुला  पुलाखाली जावून  कोसळली. यामध्ये  ज्योती वैद्य यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर मार लागला आहे. पती अशोक वैद्य यांच्या उजव्या हाताला सुद्धा चांगलाच मार लागला आहे. घटनास्थळी शेतात असलेले शिवाजी गिते यांच्यासह इतर गावकऱ्यांनी त्यांना गाडी बाहेर काढून या घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना दिली.






घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस नाईक विष्णूदास गरुड, यु. एस.बारहाते,  एस,एस.वासलवार, रमेश गिराम, आर.डी वानरे पोलीस मित्र वशीम इनामदार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या वाहनातून जखमींना चारठाणा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. 




आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा राठोड यांच्यासह औषध निर्माण अधिकारी विजय ढाकणे, स्टाफ नर्स सीमा सातपुते, आरोग्य सेविका कमल घुगरे, सुमन ठाकरे, परिचर वैजनाथ मुंजे ह्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे संदर्भीत केले. वाहनचालक इसाकोद्दीन शेख यांनी जखमींना जिंतूर येथे पोचवण्यात मदत केली. 

                          





Post a Comment

0 Comments