Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करणार - पो.नि. कुंदनकुमार वाघमारे




जिंतूर ➡️ सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय द्वेष निर्माण करून जाती जातीत तेढ निर्माण करणार्यांवर कठोर कार्यवाही करणार असून सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करण्याचे आवाहन जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिनांक 10 जून रोजी आयोजीत केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आवाहन केले. (vnsnews24, feature ) 





मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्या जाणाऱ्या पोष्टवरून काही शहरात हिंसक घटना घडल्या आहेत म्हणून जिंतूर शहरात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.





या बैठकीस ब्रिजगोपाल तोष्णीवाल संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,मौलाना सिराज, टिपूसुलतान युवा मंच बाबू खान पठाण, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक बालाजी शिंदे, माजी नगरसेवक अब्दुल रहेमान, अब्दुल मुखीद, शाहेद सिद्दीकी, पत्रकार शेख शकील, शेख अलीम यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 





यावेळी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की,सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोष्ट आली. तर पुढे न पाठवता याची पोलिसांना कल्पना द्यावी. शहरातील नागरिकांनी सजग राहून कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थे प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे. अन्यथा कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. शांतता बैठक यशस्वी करण्यासाठी गोपनीय शाखेचे फौजदार जिया खान यांनी प्रयत्न केले.






Post a Comment

0 Comments