Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला मोठा धक्का





छत्रपती संभाजीनगर ➡️  राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे. बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर उरलेल्या तीन जागांवर इतर अपक्ष यांचा विजय झाला आहे. (vnsnews24,political), 




छत्रपती संभाजीनगर बाजारसमिती माहिती

  • छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भुसार मालासाठी ओळखली जाते.(गहू, डाळिंब,) या बाजार वार्षिक उलाढाल: 3 कोटी 87 लाख.
  • छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे अशी लढत होणार आहे. गेल्यावेळी देखील बाजार समिती भाजपच्याच ताब्यात होती.छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत 15 पैकी 11 जागेवर विजयी 

  • विजयी उमेदवार

1) राधाकिसन देवराव पठाडे
2) श्रीराम भाऊसाहेब शेळके
3) गणेश सांडू दहीहंडे
4) भागचंद रुस्तुम ठोंबरे
5) अभिजीत भास्कर देशमुख
6) मुरलीधर पुंडलिक चौधरी
7) सुजाता मनोज गायके
8) जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे
9) दत्ताभाऊ पांडुरंग ऊकर्डे
10) भागिनाथ रणुबा नवपुते
11) पूनमचंद सोनाजी बमणे
1) जगन्नाथ वैजनाथ काळे
2) कैलास ज्ञानदेव ऊकर्डे
3) महेंद्र जनार्दन खोतकर
4) पठाण अब्दुल रहीम अब्दुल सलाम




तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे 4 उमेदवार विजयी(vnsnews24,political), 

एकूण 98.61 टक्के मतदान

जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत सोसायटी मतदार संघात 935 पैकी 925 मतदारांनी मतदान केले होते. तर ग्रामपंचायत मतदार संघातून 1068 पैकी 1068 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे एकूण आकडेवारी पाहिली तर सोसायटी व ग्रामपंचायतच्या एकूण 2021 मतांपैकी 1993 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होतं. तर एकूण 98.61 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे या बाजार समितीत सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अखेर भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला आहे.


भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व...

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यासाठी विशेष लक्ष घातले होते. तर मतदानाच्या दिवशी दोन्ही नेते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून बसले होते.(vnsnews24,political), 





Post a Comment

0 Comments