Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणार्‍या महिलेस आजन्म कारावास




परभणी ➡️ खंडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अभियंत्यास डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी महिलेस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परभणी जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 




या प्रकरणात दिनांक 22 ऑक्टोबर 2009 रोजी परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अंगद नवटक्के यांनी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की, आरोपी नुरजहाँ ही त्यांच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येवून व फोनद्वारे संपर्क करुन तिच्या नवर्‍याचे प्रलंंबित बिल काढा असा तगादा लावू लागली. वास्तविक त्यांच्याकडे असे कोणतेही काम प्रलंबित नव्हते. आरोपी ही नेहमी फोन करत असल्यानेअभियंता नवटक्के यांनी सतत फोन करुन त्रास दिला तर पोलीस कारवाई करेल असे सांगितले.




दिनांक 1 ऑक्टोबर 2009 रोजी सायंकाळी अभियंता नवटक्के व त्यांचा मित्र मो. अब्दुल मुजीब असे त्यांच्या शासकीय वाहनाने औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाले होते.  जालना टोल नाक्यावर एक इंडिका कार त्यांंच्या गाडीसमोर आडवी करुन थांबविण्यात आली आणि त्या गाडीतून दोन ते तीन इसम उतरले. 




त्यांनी गाडीत अभियंता नवटक्के हे असल्याची खात्री केली. चालकास गाडीच्या खाली उतरविले व सर्वांच्या खिशातील मोबाईल काढून घेतले. त्यातील एका इसमाने ती गाडी स्व:त चालवत आणली. जालन्याच्या पुढे एका शेतात गाडी थांबविली. अभियंता नवटक्के व त्यांच्या मित्रास बंदुकीचा धाक दाखवुन त्याचे अंगावरील कपडे तपासले व पैशांची मागणी करु लागले.




शे. मुजीब यास फोन देवून नातेवाईकांकडून पैशांची मागणी करण्यास सांगितले. त्याचे नातेवाईक अजिमोद्दिन यांनी दीड लाख रुपये आणून दिल्यानंतर त्याची सुटका केली व त्यानंतर आरोपी हे फिर्यादीस फोनद्वारे उर्वरित रकमेची मागणी करु लागले. या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी अर्ज केला. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून तपासात महिला आरोपी नुरजहॉ व तिचे तीन साथीदार यांनी कट रचून फिर्यादीस खंडणीसाठी डांबून ठेवून खंडणी वसुल केल्याचे निष्पन्न झाले.





या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मंगल जंगलाजी चव्हाण यांनी केला. जिल्हा न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी शुक्रवारी (दि.28) या खटल्याचा निकाल दिला. आरोपी नुरजहा उर्फ आयशा बी. इक्बाल पठाण (रा. जालना) हिस भादंवि कलम 364 अ अन्वये जन्मठेप व 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरी. तसेच कलम 387 नुसार 7 वर्षे कैद व 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. 




या खटल्यात पोलीस अधीक्षक  श्रीमती आर. रागसुधा व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी अंमलदार दत्तराव खुने, वंदना आदोडे, प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.






Post a Comment

0 Comments