Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  डीन व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करा - परभणीकर संघर्ष समितीची मागणी




परभणी ➡️ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द होण्यास कारणीभूत ठरलेले डीन डॉ. संजयकुमार मोरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांना तात्काळ निलंबित करावे, या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने शनिवार 29 एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani ) 





यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे,  परभणीकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न ज्यांच्यामुळे अडचणीत आला आहे, अशा भ्रष्ट, कामचुकार व बेजबाबदार अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करावे, त्याचबरोबर जबाबदार व कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.






या आंदोलनात रामेश्‍वर शिंदे, सुभाषराव जावळे, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, नितीन देशमुख, के. पी. कणके, गौतम भराडे, भानुदासराव शिंदे, धाराजी भुसारे, जगदीश चापके, गजानन लव्हाळे, नारायण देशमुख, सुहास पंडित, राजकुमार भामरे, पांडुरंग अंभोरे, अ‍ॅड. बाळासाहेब दळवे, डॉ. सुनील जाधव, सोनू पवार, संदीप मोरे, कल्याण क्षीरसागर, माधव थिटे, सोपानराव शिंदे, कुणाल गायकवाड, मधुकर चोपडे, मंदार कुलकर्णी, सचिन देशपांडे, निखिल जैन, भगीरथ बद्दर, दिलीप बोरुळ, सुदर्शन भांबळे, गोविंद कदम, अमोल अवकाळे, ज्ञानेश्‍वर खटिंग, बळीराज भांबळे, अभी कदम, कृष्णा शिंदे आदींचा सहभाग होता.







Post a Comment

0 Comments