Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ मालकाने ट्रकमध्ये ठेवलेल्या 71 हजारच्या रक्कमेवर ट्रक चालकाने मारला डल्ला




 


जिंतूर ➡️ ट्रकच्या केबिनच्या टूल बॉक्समध्ये आणि मंदिराच्या घरात ट्रक मालकाने ठेवलेली एकूण 71 हजार 300 रुपयांची रक्कम ट्रकच्या चालकानेच हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात ट्रकचालकाविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(vnsnews-24, crime, jintur ) 






मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान प्रांतातील नागौर जिल्ह्यातील शेवडी गावातील रहिवासी असलेले ट्रक मालक शंकरलाल मगराम तरड यांनी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील सिंगड येथील रहिवासी पुनम रामेश्वरलाल मेघवाल (३२) यांना ट्रकचालक म्हणून कामावर ठेवले होते. ट्रक मालकाने त्याच्यावर विश्वास ठेऊन ट्रकचे भाडे म्हणून मिळालेले 68 हजार 800 रुपये ट्रकच्या केबिनच्या टूल बॉक्समध्ये ठेवले होते. यासोबतच मंदिर-घरातील केबिनमध्ये 2 हजार 500 रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. अशी एकूण 71 हजार 300 रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती.





मात्र 12 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते 6 वाजेच्या दरम्यान जिंतूर एमआयडीसीतील विकास जिनिंगसमोर ट्रकचालकाने 71 हजार 300 रुपयांची रक्कम चोरून पळ काढला. ट्रक मालकाने त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. ट्रकमालक  शंकरलाल मगराम तरड  (40) यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रक चालक पुनम रामेश्वरलाल मेघवाल याच्याविरुद्ध 27 एप्रिल रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







Post a Comment

0 Comments