Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  गंगाखेड बाजार समितीवर महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतात




परभणी ➡️ गंगाखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे तसेच भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचा धुव्वा उडवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. (vnsnews-24, political , parbhani ) 



यामध्ये महाविकास आघाडीच्या (काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट भगवान सानप मित्रमंडळने  दहा जागावर विजय मिळवला. रासप व आमदार गुट्टे काका मित्र मंडळ यांच्या आठ जागा निवडून आल्या. भाजप व संतोष मुरकुटे मित्रमंडळाला एकही जागा मिळाली नाही.



कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी शनिवारी (दि. 29)  कापसे गार्डन येथे पार पडली. निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होती. या बाजार समितीत 18 पैकी 10 जागा महाविकास आघाडीच्या (काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट भगवान सानप मित्रमंडळने  हस्तगत केल्या आहेत. तर रासप व आमदार गुट्टे काका मित्र मंडळांने 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 



निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदीप तायडे यांनी काम पाहिले. सहाय्यक निबंधक कार्यालयातील पवार, सय्यद, म्हात्रे इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता.





Post a Comment

0 Comments