Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर आणि बोरी येथे भाजपाचे वर्चस्व




जिंतूर ➡️ कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर आणि बोरी येथे भाजपा आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचे निर्विवाद वर्चस्व. (vnsnews-24, feature, jintur ) 




जिंतूर मतदार संघातील ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा एकदा भाजपा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, गंगाधरजी बोर्डीकर आणि विद्यमान आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवत जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 14 जागांवर भाजपा उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे तसेच बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांपैकी 12 जागांवर भाजपा उमेदवार निवडून आलेले आहेत.




या सर्व नवीन निवडून आलेल्या संचालकांचे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी अभिनंदन केले आहे याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, वसंतराव शिंदे, भगवानराव वटाणे आणि इतर सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे चेअरमन, संचालक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सर्व बोर्डीकर प्रेमी उपस्थित होते.


कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर येथील विजयी उमेदवार सहकारी संस्था 

  • 1) गंगाधर वामनराव बोर्डीकर 339 मते 
  • 2) पांडुरंग सोमा आढे 325 मते 
  • 3) रामराव नारायणराव घुगे 329 मते 
  • 4) प्रमोद माणिकराव चव्हाण 325 मते 
  • 5) सुंदर शंकर चव्हाण 327 मते 
  • 6) रामभाऊ गोपीचंद जाधव 322 मते 
  • 7) कृष्णा शिवाजीराव देशमुख 325 मते 
  • 8) दुर्गाबाई गंगाधर कांगणे 345 मते 
  • 9) रोहिणी रमेश ढवळे 331 मते 
  • 10) विमल कैलासराव लकडे 343 मते 
  • 11) गजानन हरिभाऊ वराड 345 मते



व्यापारी मतदारसंघातून विजयी उमेदवार 

  • 12) रमण गिरधारीलाल तोष्णीवाल 41 मते 
  • 13) सचिन प्रल्हादराव देवकर 36 मते

हमाल मतदार संघातून विजयी उमेदवार 

  • 14) नामदेव कठाळू मोहिते 17 मते





बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील विजयी उमेदवार सहकारी संस्था 

  • 1) सुरेश सितारामजी खिस्ते 106 मते 
  • 2) आत्माराम श्रीरंग पवार 108 मते 
  • 3) चंद्रकांत भगवानराव चौधरी 110 मते 
  • 4) यशवंत वामनराव चौधरी 105 मते 
  • 5) वहीत खा हामिद खा पठाण 105 मते 
  • 6) प्रभाकर धोंडजी पुंड 102 मते
  • 7) हनुमान हरिनारायण सोमानी 99 मते 
  • 8) इंद्राबाई दत्तराव तिथे 105 मते 
  • 9) झुंबरबाई एकनाथ देशमुख 105 मते 
  • 10) गोविंद नामदेव खैरे 106 मते 
  • 11) लक्ष्मीकांत विश्वनाथ कानडे 112 मते 

व्यापारी मतदारसंघ 

  • 12) आनंद बनसीधर देशमुख 58 मते





Post a Comment

0 Comments