Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/क्रीडा प्रशिक्षणातुन खेळाडूंना उर्जा मिळते - डॉ.एस.एम.लोया





सेलू ➡️ सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती साठी मैदानावरील खेळ महत्त्वाचे असुन त्यासाठी लागणारी उर्जा क्रीडा प्रशिक्षण शिबिरातुनच  मिळते ,त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायणजी लोया यांनी केले. (vnsnews - 24, education, selu) 






जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बुधवार  ता. २५ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव डॉ विनायकराव कोठेकर,योगाचार्य शिवनारायण मालाणी,मुख्याध्यापक नारायण सोळंके, उप मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर, डी डी सोन्नेकर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबीरात सहभागी सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कु साक्षी गोसावी व चि अर्णव झाल्टे या खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले. योगासने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरातील खेळाडूंना सर्वांग सुंदर व्यायाम, योगासन, सुर्यनमस्कार, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रग्बी, खेळांचे कौशल्य सांगितले.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, सुत्रसंचालन सतीश नावाडे, तर डी.डी.सोन्नेकर यांनी आभार मानले. सर्व खेळाडूंना वैयक्तिक स्वच्छते साठी शिवनारायण मालाणी यांच्या वतीने इलोट कंपनी चे सॅनिटाइजर बॉटल चे वाटप करण्यात आले.



प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी राज्य खो-खो क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंग गौतम, प्रशांत नाईक,नरेंद्र झाल्टे, शिल्पा पिंपळे,सौ.शिल्पा बरडे,सोमनाथ महाजन,केशव डहाळे , अरुण रामपूरकर आदींनी परिश्रम घेतले.







Post a Comment

0 Comments