Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/शेतकर्‍यांच्या हितासाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची - खा. संजय जाधव





परभणी ➡️ शेतकर्‍यांंच्या अतिशय हिताची असणारी ही निवडणूक आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवायची आणि जिंकायची असा निर्धार त्यांनी यावेळी केला. सर्व सामान्य शिवसैनिकाला पदावर बसवून शेतकर्‍यांचे हित साधण्याचा निर्धारही व्यक्त केला. (vnsnews-24, feature, parbhani )  




खासदार संजय (बंडू) जाधव व आमदार डॉ.  राहुल पाटील यांच्या नेतृत्वात आज मंगळवारी (दि.28) शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात  परभणी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक तसेच ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांची बैठक पार पडली.





यावेळी आमदावर डॉ. पाटील यांनी देखील ही निवडणूक जिंकून सर्वसामान्य शिवसैनिकाला पदावर बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांनी केले. 





या बैठकीस उपजिल्हा प्रमुख सदाशिवराव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, पंढरीनाथ घुले, अर्जुन सामाले, सोपानराव अवचार, गजाननराव देशमुख, मारोतराव बनसोडे, माणिकराव आव्हाड, प्रभाकर जैयस्वाल, जनार्धन सोनवणे, अरविंद देशमुख, दिलीपराव अवचार, भगवानराव धस, रावसाहेब रेंगे, संग्राम जामकर, भानुदासराव डुब्बे, धनंजय देशमुख, संदीप झाडे, संजय साखरवाड, आत्माराम वाघ, वसंत देशमुख, प्रल्हादराव आव्हाड  यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, व संचालक तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शिवसैनिक, पदाधिकारी ई. उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments