Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ मानवतच्या प्रभारी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना 4 हजाराची रंगेहात लाच घेताना अटक





परभणी ➡️ मानवत पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रभारी गट विकास अधिकारी स्वप्नील शिवाजीराव पवार व विस्तार अधिकारी संदिप बाळासाहेब पवार या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.27) दुपारी सापळा रचून चार हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. कायदेशीर कारवाई करीत दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.(vnsnews-24, feature, parbhani ) 

        



एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व्यक्तीने  मानवत पंचायत समिती येथे दि.17 ऑक्टोंबर 2022 ते दि. 21 ऑक्टोंबर 2022  या कालावधी दरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत  ‘आमचा गाव , आमचा विकास ‘ उपक्रमांतर्गत  प्रशिक्षण दिलेले होते. तक्रारदार  यांचे कामाचे मानधन 14 हजार रूपये पवार यांच्या खाजगी बँक अकाऊंटवर जमा झाले होते. हे मानधन  घेण्यासाठी तक्रारदार यांनी दोन्ही अधिकारी वर्गाच्या वारंवार प्रत्यक्ष भेटून मागणी केली. अखेर तक्रारदार यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार करून सुद्धा  त्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती.




यातील पवार यांनी 14 हजार रूपये रक्कमेचा देय चेक न देता  10 हजार रूपये रक्कमेचा स्वतः च्या वैयक्तिक बँक खात्याचा चेक देऊन 4 हजार रूपये कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्विकारली. तसेच दि.2 मार्च 2023 रोजी व दि.27 मार्च 2023 रोजी यातील विस्तार अधिकारी पवार यांनी मागणी केलेल्या व स्विकारलेल्या  लाचेच्या रक्कमेस प्रभारी गटविकास अधिकारी पवार यांनी पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन संमती दिली.  





दरम्यान स्वप्नील पवार गटविकास अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), पंचायत समिती मानवत व संदीप पवार (विस्तार अधिकारी ,पंचायत समिती मानवत जि.परभणी ) यांना ताब्यात घेतलेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मानवत पोलीस ठाण्यात चालु आहे.




या कार्यवाहीसाठी डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि अतुल कदम, पोशि शेख मुख्तार, पोशि शेख झिब्राईल, चालक पोह जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो टिम परभणी यानी सापळा रचला, यशस्वी केला.




दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी  त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







Post a Comment

0 Comments