Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राज्य शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन खा. संजय जाधव यांच्या शुभहस्ते






परभणी ➡️ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्टेडियममध्ये राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा (१४ व १७ वर्षाखालील मुले/मुली) गटात क्रीडा स्पर्धेचे दि. २८ मार्च रोजी सकाळी ११ वा.परभणी लोकसभा खा. संजय जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani ) 






या प्रसंगी खा. जाधव म्हणाले की, या प्रभावती क्रीडा नगरीत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो. या क्रीडानगरी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही क्रीडा स्पर्धा साठी निधी कमी पडू देणार नाही. लवकर या क्रीडा संकुलाची नाविन्यपूर्ण उभारणी करण्यात येईल. सदरील स्पर्धेत राज्य भरातून ३२ मुले व मुली संघातील ३४० खेळाडू परभणी दाखल झाले आहेत. 




कार्यक्रम चे अध्यक्ष महेश वडजकर निवासी उपजिल्हाधिकारी परभणी, उद्घाटक.खा. संजय जाधव, लोकसभा सदस्य, परभणी, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, डॉ.पी.के. पटेल,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॉलबॅडमिंटन असोसिएशन उत्तमराव हत्तीअंबीरे अध्यक्ष परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, बॉलबॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू मधुकर निर्मल, स्पर्धा निरीक्षक शरद वाबळे, मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. ‌ 





कार्यक्रम चे प्रस्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, सुञसंचलन संभाजी शेवटे, आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, यांनी मानले. नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश खर्डेकर, प्रकाश होनवडजकर यांनी केले आहे. 






सदरील स्पर्धो बाद फेरीत खेळविण्यात येत आहे. 14 वर्षातील मुले पहिला सामना लातूर विरुद्ध नागपूर 35-22 ,35-22 विजय संघ नागपूर विजयी दुसरा सामना मुंबई विरुद्ध पुणे 36-34, 35-17 विजय संघ पुणे विभाग तर 14 वर्षातील मुली पहिला सामना छञपती संभाजीनगर विरुद्ध कोल्हापूर दरम्यान 35 -23 35 -22 भेट मध्ये विजयी संघ छञपती संभाजीनगर ठरले. 






17 वर्षे मुली गटात पहिला सामना अमरावती वि. कोल्हापूर दरम्यान 35-30,35-31 सरळ सेट मध्ये अमरावती विजयी प्राप्त केला. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेश शहाणे, सुशीलकुमार देशमुख, गणेश माळवे, शिवाजी वाघमारे, कैलास माने, विजयकुमार तिवारी, महेश काळदाते, विश्वास पाटील, किशोर ढोके, कैलास टेहरे, तुकाराम खटींग, शिवाजी काकडे, महेश शिंदे,विजय गारकर, सौ. ज्योती दिक्षित, शिवाजी खुणे, प्रकाश पंडित, धिरज नाईकवाडे, योगेश आदमे, योगेश जोशी,कलीम शेख, राजेश ढबाले, सचिन चाकुरकर, राहुल घांडगे, महेंद्र धबाले, आदी परीश्रम घेतले.








Post a Comment

0 Comments