Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूर शहरातील नागरिकांना नागरीसुविधा तत्काळ पुरवा, अन्यथा आंदोलन - संभाजी ब्रिगेड





जिंतूर ➡️ शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा स्वच्छता, नालेसफाईची कामे सुरळीत करून शहरातील नागरिकांना तत्काळ नागरीसुविधा पुरवण्यात याव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिनांक 28 मार्च रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. (vnsnews-24, feature, jintur ) 




याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून तीन दिवसाला येणारे पाणी आठ दिवसाला मिळत आहे. यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय शहरातील विविध भागात नाले सफाई नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.





सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सण व काही दिवसात हिंदू समाजाचे रामनवमी व हनुमान जयंती येणार आहे. शहरात सर्वच भागात पाणी पुरवठा व स्वच्छता वेळेवर करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने कार्यालयाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.





या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुका अध्यक्ष अँड माधव दाभाडे, अँड. मुक्तीराम शेंद्रे, सोपान धापसे व इतर पदाधिकारी व  कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.






Post a Comment

0 Comments